खेमेंद्र कटरे\गोंदिया-दि.०७–भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्या हक्काची असून ही जागा राष्ट्रवादीने अद्याप सोडलेला नाही.त्यामुळे आम्ही निवडणुक लढणार नाही असे कुणीही गृहीत धरु नये अशी रोखटोक भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफल पटेल यांनी केेले.सर्वेमध्ये एकाच माणसाचं नाव येतं आहे, त्यांचे नाव प्रफुल पटेल आहे. जे लढणार आहेत, त्यांनी समजून घेतले पाहिजे की,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याशिवाय कुणालाही येथे निवडून येता येत नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याने विचलित होण्याची गरज नाही, असेही ते जाहीर सभेत म्हणाले आहे. त्यामुळे आपल्याला वगळून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघात लढण्याचा विचार करू नये, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे.
ते गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी (अजित पवार)गटाच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात आज बोलत होते़. तसेच दोन्ही जिल्ह्यांतील आमदार- खासदारांची कुंडली माझ्याकडे आहे, असा थेट इशारा त्यांनी व्यासपीठावर उपस्थित आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार राजू कारेमोरे यांच्याकडे कटाक्ष टाकत एक प्रकारे त्यांनाही आपल्यासोबत राहण्यात फायदा आहे, अशी समजसुद्धा या इशाऱ्यातून दिल्याचे जाणवले. त्यामुळे प्रफुल पटेल यांचे आजचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे
सोबतच पटेलानी गोंदिया व भंडारा येथील अपक्ष आमदार आमच्या राष्ट्रवादीमुळे निवडून आले.पण ते आज इकडून तिकडे फिरत आहेत. त्यानाही वेळेवर जागा दाखवण्याची वेळ येणार आहे. आपण जिल्ह्यासाठी काय-काय केले, यांची पावती देताना पटेलांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांचे नाव न घेता जिल्ह्यासाठी त्यांचे योगदान काय, असा प्रश्न केला.असे सांगतानाच भेल प्रकल्प २०१४ मध्ये जे निवडून लोकसभेत गेले त्यांनी वाट लावली. भेल प्रकल्पाची ‘भेलपुरी’ झाली तरी हा प्रकल्प सुरू करू शकले नाही. मात्र हा प्रकल्प पूर्ण करून दाखवू, असेही पटेल म्हणाले. जो व्यक्ती आपल्या तालुक्याचा विकास करू शकला नाही, तो जिल्ह्याचा विकास कसा करू शकेल? कोणाची काय औकात आहे, हे लोक जाणतात, असे खडेबोल पटेलांनी सुनावत आमदारानो तुमची कुंडली माझ्याकडे आहे.इतरांचीही कुंडली माझ्या हातात आहे हे विसरू नका मी तुम्हाला मागे पडू देणार नाही.
मात्र भाजपची मैत्री ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी केली भंडारा गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या निरंतर प्रवाहात आणणे आणि येथील जनतेला सर्व घटकांना योजनांचा लाभ व्हावा हाच एक प्रामाणिक हेतू ठेवून मैत्री करण्यात आली. आगामी लोकसभेच्या निवडणूकीला येथील उमेदवारी ज्या पक्षाकडे जाईल त्यांचा युती धर्मानुसार प्रामाणिकपणे काम करायचे आहे..जिल्ह्यात कॉंग्रेस फक्त टिव्हीवर असून विधानसभेत फक्त दोन जागेवर समाधान मानून चालणार नाही अजितदादा हे तुम्हाला आजच सांगतो़. सर्वेत प्रफुल पटेलांचा नाव प्रथम क्रमाकांवर आहे हे भाजपनेही विसरून चालणार नाही अशी रोखठोक भूमिका घेतली.