महाविकास आघाडीला साथ द्या- उद्धव बाळासाहेब ठाकरे

0
11

पुसद:- राज्यातील एक फुल दोन हाप सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? यवतमाळ जिल्हा सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून देशातच नव्हे तर जगात ओळखल्या जातो. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. पिक विमा, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव अजूनही मिळत नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकारहे आश्वासनही विसरले. फसवी कर्जमाफी या व अशा अनेक विविध विषयांवर केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले. ते दि.१२ मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता येथील वाशिम (Washim) रोड वरील विठाबाई नगर मधील खुल्या मैदानात त्यांची प्रचार पूर्व भव्य जनसंवाद सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी क्रीडा राज्यमंत्री तथा संभाव्य यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख,ऍड दिलीप एडतकर, ऍड. आशिष देशमुख, डॉ. मोहम्मद नदिम, कॅप्टन प्रशांत सुर्वे, राजू वाकडे, अशोक बाबर, साकिबशहा, माधवराव वैद्य,  प्रवीण शिंदे, राजू गायकवाड, राजू साकला, विकास जामकर, रवी पांडे, संतोष दरणे, इस्तियाक भाई, पोहरागडचे महंत सुनील महाराज यांच्यासह इत्यादी मान्यवर विराजमान होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख, ऍड. दिलीप एडतकर, प्रवीण शिंदे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, डॉ. मोहम्मद नदिम आदींनी सभेला संबोधित केले.

यावेळी संजय देशमुख म्हणाले की, पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पाण्याचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षांत ही सुटलेला नाही. येथील राज्यकर्त्यांनी त्याकडे गांभीर्याने बघितलेच नाही. हा प्रश्न नक्कीच सोडविल्या जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला मतदारांना आश्वासने देतात सत्तेत आले की मात्र ते विसरून जातात. असे मार्गदर्शन त्यांनी भव्य सभेला संबोधित करताना केले. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या निवडणूक पूर्व झालेल्या भव्य जन संवाद सभेला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिवसेना उभाठा(Shiv Sena)काँग्रेस(Congress)शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(Sharad Chandra Pawar Nationalist Congress Party)यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी जुने जाणते शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला आलेले दिसत होते.