काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर;भंडारा-गोंदिया पडोळे,नागपूर ठाकरे व गडचिरोलीतून किरसान रिंगणात

0
14

नव्या चार उमेदवारांची घोषणा; नागपूर, रामटेक, गडचिरोली आणि भंडारा-गोंदियाचा समावेश

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. देशपातळीवर काँग्रेसची ही चौथी यादी असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुर्व विदर्भातील चार उमेदवारांचा समावेश आहे.यात नागपूरातून आमदार विकास ठाकरे,रामटेकमधून माजी जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे,गडचिरोलीतून डाॅ.नामदेव किरसान व भंडारा-गोंंदिया मतदारसंघातून डाॅ.प्रशांत यादवराव पडोळे यांचा समावेश आहे.चंद्रपूरचा तिढा न सुटल्याने तिथे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

काँग्रेसच्या चौथ्या यादीत आसाममधील एक, अंदमान आणि निकोबारमधील एक, छत्तीसगडमधील १, जम्मू-काश्मीरमधील २, मध्य प्रदेशधील १२, महाराष्ट्रातील ४, मणिपूरमधील २, मिझोराममधील १, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील २ तर पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

रामटेकमधून रश्मी बर्वे
भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे
नागपूरमधून विकास ठाकरे
गडचिरोलीमधून नामदेव किरसान