….अखेर डाॅ.फुकेंना लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीत पक्षाने नाकारले

0
58

गोंदिया,दि.24- आज लोकसभा 2024 च्या निवडणूकीकरीता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पुुन्हा विद्यमान खासदार सुनिल बाबूूराव मेंढे यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने जाहिर केली.मेंढे हे दुसर्यांदा विजयी पताका फडकवतात काय याकडे लक्ष लागलेले असतानाच नागपूर निवासी व तत्कालीन भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे माजी आमदार डाॅ.परिणय फुके यांना मात्र भाजपने पुन्हा लोकसभा निवडणुकीत उमेदावारीतून नाकारले आहे.तर विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठल्याही राजकीय नेत्यांशी न केलेले गैरवर्तण आणि त्या नेत्यांवर टिकात्मक भाषेपासूूनही केलेला बचाव यावेळी महायुतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळवितांना मदतशीर ठरले आहे.

प्रफुल पटेलामुळे या मतदारसंघाच्या नावावर शिक्कामोर्तब अडकल्याची जी चर्चा सुरु आहे.त्या चर्चेलाच काही अर्थ नसून भाजपच्या उमेदवारामध्ये असलेल्या चुरसीमुळे आणि स्थानिक व बाहेरच्या या दोन मुद्यामुळेच खरं तरं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नावावर शिक्कामोर्तब करण्यात अडचण चालली होती,हे खरं कारण आत्ता या उमेदवारीने स्पष्ट झाले आहे.

मूळचे नागपूरचे असलेले डाॅ.परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास जवळचे असल्यामुळे त्यांना 2016 मध्ये नाना पटोले भाजपमध्ये असतांना भंडारा-गोंदियातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती.कारण काय तर फडणवीसांसह पटोलेंंना राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचा पराभव करायचा होता.परंतु हेच डाॅ.फुके आपल्यावर राजकीयदृष्टा वरचढ ठरतील याची किंचीतही मनात शंका न ठेवणारे पटोले राजकारणात फसले.आणि फुके यांनी विधानपरिषदेच्या अवघ्या तीन अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतरच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीकरीता प्रतिष्ठापणाला लावली.त्यावेळी सुध्दा फुके हे मूळचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नाही हा मुद्दा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही जोरदार विरोध करण्यात आलेला होता.त्या विरोधात माजी आमदार चरण वाघमारे हे सर्वात पुढे होते.त्यावेळीही स्थानिक व बाहेरच्या मुद्यामुळेच फुके यांना अंतिम क्षणात उमेदवारीपासून वंचित रहावे लागले होते.तीच परिस्थिती पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बघावयास मिळाली.2019 च्याही अधित तुलनेत डाॅ.फुके यांचा भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मूळ अनेक भाजप नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक व बाहेरचा हा मुद्दा रेठून धरल्याने पक्षातंर्गत कलह वाढीस गेलेला होता.त्यातच विद्यमान खासदार मेंढे व माजी आमदार फुके यांच्यामुळे गटातटाचे राजकारण होत असल्याच्या अनेकदा वावड्या उठल्या होत्या.त्या वावड्या पक्षाच्या दिल्ली मुख्यालयापर्यंत यावेळी पोचल्या.आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवसापासूनच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सोशलमिडियावर सर्वात समोर असलेले फुके हे अचानक मागे पडले.आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपमध्ये पहिल्या चार नावात सुनिल मेंढे यांच्यासोबत डाॅ.परिणय फुके यांचे नाव राहिले असले तरी शेवटच्या आठवड्यात मात्र सुनिल मेंढे व विजय शिवणकर या दोन नावावरच चर्चा पक्षात होऊ लागली.त्यातच भंडारा अर्बन बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करुन राष्ट्रवादीच्या संचालकांची झालेली तोडफोड राष्ट्रवादीच्या नेत्यांना पचणी पडलेली नव्हतीच त्यासह अनेक कारणांनी महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीनेही आम्हाला भंडारा-गोंदिया जिल्ह्यातीलच मूळचा उमेदवार द्या इतर नको ही भूमिका ठेवल्याने भाजपसमोर चांगलाच पेच फसलेला होता.तो पेच अखेर होळीच्या दिवशी भाजपने महायुतीच्या घटक पक्षाला विश्वासात घेत सोडवित सुनिल मेंंढे यांना पुन्हा रिंगणात उतरवले तर डाॅ.फुकेंना दुसर्यांदा उमेदवारी नाकारल्याने हळूहळू डाॅ.फुके यांचा परतीचा प्रवास या लोकसभा मतदारसंंघातून सुरु होतोय की विधानसभेपर्यंत थांबतोय याकडे लक्ष लागले आहे.