नागपुरात काँग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन, विकास ठाकरेंचा अर्ज दाखल

0
15

नागपूर : नागपूर लोकसभेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला नागपूर लोकसभेसाठी मतदान होत आहे. १७ एप्रिल रोजी राम नवमी आहे आणि उमेदवारांना १७ एप्रिलपर्यंत प्रचार करता येणार आहे.विकास ठाकरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ॲड. आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नाना गावंडे, अतुल लोढे, संदेश सिंगलकर, विशाल मुत्तेमवार आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित संविधान चौक ते नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. या शक्तीप्रदर्शनानंतर उमेदवारी अर्ज ठाकरे यांनी दाखला केला.
काँग्रेसने पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यांचा राजकीय प्रवास  नागपूरचे महापौर, विरोधी पक्ष नेतेपद ते आमदार आणि पक्ष संघटनेत दहा वर्षे शहराध्यक्ष असा राहिलेला आहे.लोकसभेच्या जागेसाठी उच्छुक माजी नगरसेवक प्रफुल गुडधे, बंटी शेळके देखील उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसची एकजूट दिसून आली.