भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज सात अर्ज दाखल
आतापर्यंत सहा उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
भंडारा दि. 26: 11- भंडारा – गोंदिया सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले. आतापर्यंत सहा उमेदवारांनी एकूण नऊ नामांकन अर्ज दाखल केले आहे.आज मंगळवारी अजयकुमार भारतीय, सुमित पांडे, ओबीसी हिंदू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष,संपादक व सामाजिक कार्यकर्ता एड.विरेंद्र कुमार जयस्वाल, विलास राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज 24 उमेदवारांनी एकूण 51 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 98 इच्छूकांनी 202 अर्ज उचल केली आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा उद्या बुधवार शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.