नागपूर: केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. संविधान चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
नागपुर | लोकसभा चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल करने हेतु रैली से लाइव। #अपने_नागपुर_के_लिए #ApaneNagpurKeLiye #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024 #GeneralElections2024 |
https://t.co/oEfLIuTJy5— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 27, 2024
संविधान चौकातून मिरवणूक निघाली असून आकाशवाणी चौकात नितीन गडकरी जनतेला संबोधित करणार आहे. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष गट, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष. सतीश लोणारे देखील उपस्थित होते.