पी.डी.रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

0
14

गोरेगाव,दि.27-  स्थानिक पी डी रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील वर्ग 8 ते 12 मध्ये शिकत असलेल्या किशोरवयीन मुलींना बेटी बचाव बेटी पढाओ योजने अंतर्गत मासिक पाळी व स्वच्छ्ता व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोरेगाव अंतर्गत एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला नोडल अधिकारी सौ.श्रीवास्तव मॅडम, मार्गदर्शक म्हणून डॉ. अंकिता बिसेन, डॉ. विद्या कटरे, पर्यवेक्षक ए.एच.कटरे ,सौ.एस पी तिरपुडे उपस्थित होते. दोन्ही डॉक्टरनी विद्यार्थीनीना किशोरवयामध्ये शरीरात होणारा बदल, मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची दक्षता या बाबद मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सौ. ए एस बावनथडे , कु. एस आर मांढरे , कु.एस जी दमाहे ,कु. जे वाय बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कु.एस आर मांढरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सी डी मोरघडे, पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी धन्यवाद व्यक्त केले.