वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेना पाठिंबा,पुण्यात वसंत मोरे उमेदवार

0
7

पुणे : पुण्यातील (Pune loksabha Election) लोकसभा निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीकडून (LokSabha Elections) लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून पुण्याच्या जागेवर वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा देण्यात आला असून, यांच्या विरोधात देणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या यादीत  नांदेड जागेवर अविनाश भोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले तर, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिरूरमधून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.