पुन्हा हत्तीकळप: शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण

0
8

देसाईगंज -तालुक्यात ओडीसा राज्यातून भटकलेल्या (Elephant herds) हत्तीकळपाने, गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून होते. काही दिवस रवी जंगलात वास्तव्य केल्यानंतर पुन्हा उसेगाव शेत शिवारात हत्ती परत आल्याने फुटनिवर आलेल्या (Paddy crop Damage) धान पिकाची नासाडी करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे .

धान पीक लावनी झाली, तेव्हापासूनच आरमोरी तालुक्यातील पाथरघोटा व देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव, फरी, विहीरगाव, ऊसेगाव परिसरातील धान पिकांची (Elephant herds) हत्तीच्या कळपाणे नासाडी केली होती. 14 दिवसाच्या पूर्वी हा हत्तीकळप रवीच्या जंगलाच्या दिशेने गेला होता. काही दिवस रवी परिसरात वास्तव्य असल्याने शेतकर्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. आता (Paddy crop Damage) धान पीक फुटणेचा तयारीत असताना एक तारखेला (Elephant herds) हत्तीच्या कळपाने पुन्हा उसेगाव परिसरात परत आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसत आहेत.गेल्या महिन्यात विहिरगाव येथील शेतकऱ्यांच्या )Paddy crop Damage धान पिकाची नुकसान केली व शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे पाईप लाईन फोडले होते ,त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, पंचनामे करून पुरेशी राशी मिळाली नाही व पुन्हा त्याच शेतात जर हत्यांनी नुकसान केल्यास तर आता शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून (Forest Department) वन विभागाने अतिरिक्त हुल्ला टीम बोलावून (Elephant herds) हत्तीकळपाचे बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे