देवेंद्र व परिणय सोडून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा मीच रेफरी-प्रफुल पटेल

0
45

गोंदिया,दि.०५-भंडारा-ोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी नागपूर निवासी देवेंद्र व परिणय सोडले तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचा मी रेफरी(रिंगमास्टर) असल्याचा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली आहे.ते येथील ग्रँड सीता हॉटेलच्या हॉलमध्ये शहरातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, चाबी संघटन व आर.पी.आय महायुतीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्या बैठकीत आज शनिवारला बोलत होते.

यावेळी मंचावर भाजपचे विश्वास पाठक,आमदार विनोद अग्रवाल,माजी आमदार राजेंद्र जैन,परिणय फुके,गोपालदास अग्रवाल, रमेश कुथे,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, विनोद हरिणखेडे नेतराम कटरे,अशोक इंगळे,राजकुमार भेलावे,छोटूभाऊ पटले, श्री कशीश जायस्वाल, पूजाताई अखिलेश सेठ,नानु मुदलीयार,अमित झासह पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना खा.पटेल म्हणाले की, लोकसभेची निवडणुक ही देशाची निवडणुक आहे. सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य विकशिनशील देश म्हणुन प्रभावीत करणारे आहेत.आज भारताची ओळख जगात सर्वात शक्तिशाली व विकशिनशील देश म्हणुन ख्याती प्राप्त आहे.आणी हे केवळ नरेंद्र मोदी मुळेच शक्य झाले आहे.त्यामुळे आपन प्रभावीत होवुन व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपन भाजपसोबत आहोत.त्यामुळे सशक्त भारतासाठी मोदींजींचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.ते करीत असतानाच माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार विनोद अग्रवालांना लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्याचा सल्ला दिला.तसेच या दोन्ही जिल्ह्यातील कुठल्याही पक्षाचा नेता असो त्यांना खेळवण्याचे काम मीच करीत असतो होय की नाही रमेशभाऊ असे म्हणत मीच यांचा रेफरी आहे.फक्त नागपूरचे आमचे देवेंद्र व डाॅ.परिणय यांचाच रेफरी नाही.परंतु परिणयचा सुध्दा मीच रेफरी होणार होय की नाही असे म्हणताच सभागृहात कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून आला.