गृहमंत्री अमित शहा यांची गोंदियातील जाहीर सभा रद्द

0
74

गोंदिया,दि.०५ः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवारांच्या प्रचाराकरीता उद्या ०६/०४/२०२४ रोजी शानिवारला आयोजित गोंदिया येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची होणारी जाहीर सभा रद्द झालेली आहे.विशेष म्हणजे या सभेचा आढावा घेण्याकरीता व सभेच्या यशस्वीतेकरीता प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्याकरीता भाजप नेते विश्वास पाठक यांनी दुपारी २ वाजता पत्रकारपरिषदही घेतली होती.मात्र पत्रपरिषदेच्या अवघ्या दीड तासानंतरच ही सभा रद्द करण्यात आल्याचे संदेश देण्यात आल्याने पुढे कधी येणार हे नंतरच कळणार आहे.