पटलं तर मतं द्या, नाहीतर देऊ नका म्हणणारे नितीन गडकरी प्रचारसभांतून मतदारांच्या दारात

0
12

गोंदिया,दि.०६- पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही की कार्यकर्त्यांना चहापाणी करणार नाही आणि पोस्टरही लावणार नाही. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोक मत देतील, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमात जाहीरपणे केले होते.मात्र त्याच नितीन गडकरींवर नागपूर लोकसभा मतदारसंंघात प्रचाराकरीता कार्नर सभा घ्यायची वेळ आलेली आहे.कुटुबांतील सदस्यांना प्रचाराकरीता फिरावे लागत आहे,स्वतःही प्रचाराकरीता फिरत बसले आहेत,त्यामुळे गडकरींनाही कळून चुकले आहे की भाषण देऊन काही होत नाही,जोपर्यंत मतदाराच्या दारापर्यंत जाऊन मत मिळत नाही.

“मी जे काही बोललो, ते केलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात. राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. मी ठरवलय यावेळी लोकसभा निवडणुकीच्यावेळी पोस्टर-बॅनर लावणार नाही. चहा-पाणी करणार नाही. मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ. प्रामाणिकपणे सेवा करीन. कुठलीही माल-पाणी मिळणार नाही. लक्ष्मी दर्शन होणार नाही. देशी-विदेशी नाही मिळणार. मी पैसा खाल्ला नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही” असं नितीन गडकरी वाशिममध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमात म्हणाले होते.

लोकांना सांगतो आहे तुम्हाला पटलं तर मतं द्या, नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही,” अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये  ते वनराई फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत (26 मार्च) होते.साहेब एवढं बोलूनही आपण कशाला शहरातील गल्लोगल्लीत फिरत बसलात,कशाला लावताय लोणी होऊ द्या की तुमच्या केलेल्या विकास कामावरच मतदान अशी टिका आत्ता होऊ लागली आहे.