खोडशिवनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक उत्साहात

0
1

सडक अर्जु्नी,दि.१३ः तालुक्यातील खोडशिवनी पंचायत समिती क्षेत्र खोडशिवनी गावातील भोलाजी कापगते यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या बुथ कमिटीची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व तालुकाध्यक्ष डॉ अविनाश काशीवार यांच्या मार्गदर्शना खाली सभेची सांगता झाली. बैठकित खासदार प्रफुल पटेल यांनी केलेली विकास कामे आणि बुथच्या माध्यमातुन पक्षाची वाढ मजबुतीबाबत देवाजी बनकर, भैयालाल पुस्तोडे, यूवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष राहूल यावलकर सह अन्य कार्यकर्त्यांनी आदी प्रमुखांनी पक्ष विस्तार व बुथ बळकटी करणाबाबत मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते खासदार प्रफूल पटेल यांनी खोडशिवनी परिसरात केलेल्या अनेक विकासकामांचा कार्यकत्यानी उल्लेख केला. मनोहर चंद्रिकापूरे यांनी विकासकामांच्या संदर्भात आढावा मांडला. विद्युत विभागाचा डी.पी., हळदीघाट तिर्थक्षेत्रातील बंधारा व मोकाशीटोला या मार्गाबाबात कार्यकत्यानी चर्चा केली. त्यावर आमदार  मनोहर चंद्रिकापुरे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या बैठकित कार्यकत्यानी संघटीत होउन पक्षाप्रती समर्पित भावनेने काम करत लवकरच बुथ कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकित खासदार प्रफूल पटेल यांच्या माहितीनुसार सर्व कार्यकार्यकर्त्यांनी महायूतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांचा प्रचार केला, त्या संदर्भात पक्षाने सर्वाचे आभार मानले. बैठकिला खोडशिवनी, सिंदीपार , गिरोला, घाटबोरी, बोधीनगर बिरी, माउली, मोकाशीटोला येथिल प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी बुथ कमिटीची बैठक हळद़ीघाट तिर्थक्षेत्र संकृलात घेण्याचे ठरले. डॉ काशीवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, राहुल यावलकर, भैय्यालाल पुस्तोडे, डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, भृंगराज परशुरामकर, देवाजी बनकर, नाजूक झिंगरे, भोला कापगते, आस्तिक परसुरमकर, भागवत झिंगारे, अनमोल राऊत, सूर्यभान ठलाल, अजित डोंगरवार, ग्यानीराम कापगते, सयाजी कापगते, वासुदेव पर्वते, भोजराज डोंगरवार, काशिराम कापगते, श्यामराव मस्के, शीला कापगते, भारती कापगते, भूमिका परशुरामकर, उर्मिला नेवारे, प्रीती कापगते, छाया परशुरामकर, रेखा कागगते, आनंदा कपगते, संगीता परशुरामकर, किरण परशुरामकर, सुमन परशुरामकर, रेखा मौजे, रमेश कोळवते, भूपेश परशुरामकर, सुभाष परशुरामकर, महेंद्र कापगते, विलास कापगते, अशोक परशुरामकर, श्रीराम मेश्राम, मन्साराम शेंडे, अभिमान परशुरामकर, शामराव मस्के, संजय परशुरामकर, रविराज कापगते, मिलिंद कापगते, सतीश मौजे, सयाजी कापगते, धनपाल परशुरामकर, पुनीराम मस्के, श्रीधर कोटवते, विनाराम कापगते, तुळशीराम मेश्राम, मंगरू परशुरामकर, सुभाष मेश्राम, रूपराज परशुरामकर, संजय कापगते, सुखदेव कुंभरे, देवदास वसंता कापगते, जांभुळकर, पुरुषोत्तम परशुरामकर ,नेत्राम साय्याम, भास्कर जांभुळकर, उदाराम वरखडे, भोजराज डोंगरवार ,भिवाजी मेश्राम, जवाहरलाल मेश्राम,यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.