मुख्यमंत्री शिंदे, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, तटकरेंची मोदींसोबत चर्चा

0
16

एनडीएची दिल्लीत बैठक पार पडली.या बैठकीसाठी मुख्यमंत्री”एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील नेत्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी मोदींनी “महाराष्ट्र” तील नेत्यांच्या भेटीत राज्यांतील पराभवाची कारणं जाणून घेतली. राज्यांतील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे. राज्यांतील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याची देखील माहिती नेत्यांनी मोदींना दिली. त्यासोबतच विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्देश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.