संघर्ष अवसरे यांची भाजपा युवा मोर्चा भंडारा जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती

0
3

भंडारा-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) संघर्ष अवसरे यांची भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) भंडारा जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवसरे हे एक धडाडीचे कार्यकर्ते असून आंदोलन व नेतृत्व गुणांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ते नेहमीच लढत आले आहेत.अवसरे यांनी आपल्या नियुक्तीवर पक्षाचे व वरिष्ठांचे आभार व्यक्त केले आणि युवा कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या,युवकांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्यास आणि भाजयुमोला जिल्ह्यात मजबूत बनवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे वचन दिले. भाजयुमो भंडारा जिल्हाध्यक्ष निशिकांतजी इलमे यांनी अवसरे यांची नियुक्ती केली असून नियुक्ती पत्रक काढून माहिती देण्यात आली.