काँग्रेसकडून खा.अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो…

0
31

ब्रम्हपूरी : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदर अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ ब्रम्हपूरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. व भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक नितीन उराडे, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काँग्रेस सचिव मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, बाजार समिती उपसभापती सुनीता तिडके यांसह तालुका/शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल , सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.