बदलापूर, आरमोरी, नागभीड सह राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने केला निषेध

0
30

हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून, अमानवीय कृत्यांचा करण्यात आला निषेध

गडचिरोली :: बदलापूर येथे शाळेतील मुलीवर झालेले कृत्य हें अमानवीय आहे, अश्या प्रकारचे अमानवीय कृत्य आरमोरी, नागभीड, आणि राज्यातील इतर ही भागात घडत आहेत. मात्र राज्य सरकार अश्या घटनांनवर आढा बसविन्याकरिता अपयशी ठरत आहेत. अश्या या अमानवीय घटनांचा आणि राज्यातील महायुती सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोली येथे, हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करण्यात आले.
यावेळी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाप्रमुख शिवसेना वासुदेव शेडमाके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर अध्यक्ष विजय गोरडवार, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश ताकसांडे, सचिव जिल्हा मा. क. पं. देवराव चवळे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी, शहराध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली सतिश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, महिला जिल्हाप्रमुख शिवसेना छायाताई कुंभारे, डॉ. सोनल कोवे, जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी गडचिरोली नितेश राठोड, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली अब्दुलभाई पंजवानी, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग काँग्रेस कमेटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, अतुल मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, सुनील चडगुलवार, महासचिव देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, प्राचार्य लांजेवार, प्रभाकर वासेकर, चारुदत्त पोहाने, राकेश रत्नावार, गौरव येनप्रेड्डीवार, उत्तम ठाकरे,स्वप्नील ताडाम,जावेद खान,सुरेश भांडेकर, माजिद सय्यद, सुभाष धाईत, बंडोपत, अविनाश श्रीरामवार,आरती खोब्रागडे, पुरषोत्तम सिडाम, सर्वेश पोपट,सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.