गोंदिया,दि.१३ः- ई़डी,सीबीआयच्या माध्यमातून आमचे नेते राहुल गांधीना भिती दाखवण्याचे काम केले,परंतु ते घाबरले नाहीत.संविधानाच्या रक्षणासाठी ते लढले.देशाच्या प्रधानमंंत्र्यांनी सर्वेोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांच्या घऱी जाऊन न्यायालयातील निर्णयावर दबावतंत्राचा वापर करीत संविधान संपवण्याचे कटकारस्थान रचल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पर्यवेक्षक व प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
पुढे बोलतांना चेन्नीथला म्हणाले या देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाले पाहिजे,या देशातील बहुसंख्य आहे त्या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी आमच्या नेत्यांची मुख्य भूमिका आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष बनेल अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्वच नेते एकदिलाने काम करीत असून आमच्या नेत्यामध्ये कुठलेच मतभेत नसून राज्यातील महायुती सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याचे काम करीत असल्याचे म्हणाले.महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसला लोकसभेत दिलेले यशामुळेच देेशातील भाजपची सरकार स्वबळावर येऊ शकली नाही.गोपालदास अग्रवाल सारखे व्यक्तीमत्व भंडारा-गोंदिया जिल्ह्याकरीता महत्वाचे असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुुन खडगे यांनी सांगितले,तेव्हा अग्रवाल यांचे काँगेसबद्दलची आस्था किती महत्वाची आहे कळल्याचेही चेन्नीथला म्हणाले.राज्यातील ही सरकार आयाराम गयारामची सरकार आहे.आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भंडारा-गोंदिया ही कर्मभूमी आहे.येथून मोठमोठे नेते निवडून जायचे,ते आज विचारधारा सोडून निव्वळ आपल्या भष्ट्राचाराला लपवण्याकरीता तिकडे गेल्याचीही टिका केली.तसेच पटोलेंंच्या नेतृत्वात राज्यातील विधानसभेची निवडणुक मोठ्या संख्येने जिंकू अशी आशा व्यक्त केली.
चेन्नीथलानी केला पटोलेंना मुख्यमंत्री पदाचा इशारा
साकोलीतील मतदारांनी नाना पटोलेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांना राज्यातील प्रत्येक भागात प्रचाराकरीता जावे लागणार आहे.त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने व कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार समजून लढाई लढायची आहे असे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना करीत गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशाची अधिकृत घोषणा केली.
राज्यातील जातीयवादी व दंगलखोर सरकारला हाकलून लावा-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की राज्यातील महायुती सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही कमीशन खाण्याची वेळ आली असली सरकार आपल्याला हटवयाची आहे.राज्यातील शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी महिलांचे प्रश्न देशातील नरेंंद्र मोदी व राज्यातील महायुती या जातीयवादी व दंगलखोर सरकारला सोडवता आलेले नाहीत अशी टिका करीत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेत जसा निकाल विदर्भात दिला,तसाच निकाल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमधील कुठला पक्ष कुठे जाईल हे नक्की नसले तरी १०० च्या आत ते राहतील असेही चव्हाण म्हणाले.माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी योग्य वेळी काँगेस पक्षात परत येणाच्या निर्णय घेतल्याचेही म्हणाले.
एैका नितिन राऊत काय म्हणाले
आज गोंदियातील सर्कस मैदान येथे श्री. गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षातला घर वापसी समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त उपस्थित राहून गोपाल भैय्यांचे मनोभावे स्वागत केले तसेच उपस्थित नागरिकांना व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
गोपालजींच्या पुन्हा घरी परतल्याने काँग्रेसला… pic.twitter.com/eNC2nxi9xs
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 13, 2024