माजी आमदार गोपालदास अग्रवालांचा काँग्रेस पक्षात हजारोच्या उपस्थितीत प्रवेश
महाविकास आघाडीची सरकार येताच धानाला १००० रुपये बोनस देणार
गोंदिया,दि.१३ः-आमच्या जिल्ह्यात एक स्वनामधन्य नेता होता,त्या माणसाने काँग्रेसला संपवण्याचे काम कसे करता येईल तेच केले आहे.भाजपच्या माध्यमातून ते या विधानसभा निवडणुकात अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचे काम ते करणार आहेत.परंतु आम्ही त्या नेत्याला आताच इशारा देऊन ठेवतो भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ७ ही विधानसभा मतदारसंंघात आम्ही महाविकासआघाडीचे उमेदवारच निवडून आणू अशी ग्वाही देत त्या नेत्यांनी जास्त भांडण लावायचे काम बंद करावे.गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या स्वनामधन्य नेत्याने विकासाचे गाजर दाखवून या जिल्ह्याच्या विकास खुंटवणार्या त्या भाजपच्या दलाल नेत्याला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्प राहण्याचा इशाराच नाना पटोलेंनी यांनी अप्रत्यक्षरित्या प्रफुल पटेलांचे नाव न घेता दिला आहे.त्या स्वनामधन्य नेत्यामुळे गोपालदास अग्रवाल व मला किती त्रास सहन करावा लागला हे ठाऊक असल्याचेही म्हणाले.
मंचावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री नितिन राऊत,सुनिल केदार,सतिश चतुर्वेदी,आदिवासी नेते शिवाजीराव मोघे,खासदार प्रशांत पडोळे,खासदार नामदेवराव किरसान,खासदार श्याम बर्वे,आमदार सहसराम कोरेटे,आमदार अभिजित वंंजारी,माजी खासदार शिशुपाल पटले, वारासिवनीचे आमदार विवेक पटेल,परसवाडा आमदार मधु भगत,माजी आमदार हिना कावरे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,माजी आमदार गोपालदास अग्रवाल,माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत,गोंंदिया प्रभारी नाना गावंडे,माजी आमदार कुणाल चौधऱी,पी.जी.कटरे,अमर वराडे,विनोद जैन,अशोक गुप्ता,जितेश राणे,जितेंद्र कटरे,धन्नालाल नागरीकर,राजकुमार (पप्पू)पटले,योगेश बापू अग्रवाल,रमेश अंबुले, यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले गोंदिया जिल्हा हा कुण्या एका नेत्याचा नव्हता तर काँग्रेसचा व सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचा जिल्हा आहे.आता काँग्रेसपक्ष पुन्हा गोंदिया जिल्ह्यात गोपालदास अग्रवालांच्या प्रवेशाना पुन्हा बळकट झालेला आहे.आमचे नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे.मात्र विरोधी पक्षाचे नेते चुकीचा अर्थ काढून आमच्या नेत्याविंषयी गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहे.भाजपही आरक्षणाची विरोधक आहे,आजही ते जातीगत जनगणना करण्यास टाळाटाळ करते यावरुन सामान्य नागरिकांनी आजा सजग राहून संविधानाच्या रक्षणाकरीता संघटित राहिले पाहिजे.
LIVE: पक्षप्रवेश सोहळा, गोंदिया https://t.co/wVISn3SjfJ
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 13, 2024
पटोले म्हणोले म्हणाले की महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात पावणे दोन हजार शेतकयानी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडे असून अजून आकडे मोठे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या तीन चार दिवसापासून सर्वत्र अतिवृष्टी होत असतांना पिकपंचनामे अजून सुरु झालेले नाहीत.तर पिकविमा कंपन्या या मोदींच्या मित्रांच्या असून ते सर्वसामान शेतकयाना लुबाडण्यासाठी असल्याचीही टिका केली.तसेच गोंदिया राईस सिटीच्या नावाने प्रसिध्द आहे,मात्र राईस सिटीतील राईस मिल व्यवसायच आज केंद्र व राज्यातील सरकारमुळे संकटात आल्याचेही म्हणाले.
धान उत्पादक शेतकर्यांच्या धानाला योग्य दर देऊन १००० रुपये क्विटंल बोनस आमची सरकार आल्यास देऊ.शेतीवर आधारीत उद्योग आणण्याचे काम आमचे सरकार करणार आहे.गावातील युवकांना गावातच रोजगार कसा मिळेल याकरीता आमची महाविकास आघाडीची सरकार काम करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.भाजपवाल्यांच्या लालीपाॅपच्या आमिषाला बळी पडू नका.जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार करु शकतात अशा लोकांना सत्तेतून दूर करायचे आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे महाराष्ट्रात खड्यांचे साम्राज्य दिसून येत आहेत.हे खड्डे या राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचे दुकान असल्याची टिका केली.गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न आपण बघितले ते पुर्ण करण्याचे आश्वासन देत असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार,नितीन राऊत,सुनिल केदार,आमदार सहसराम कोरेटे आदींनी विचार व्यक्त केले.गोंंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड यांनी स्वागत पर प्रास्तविक केले.संचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.राष्ट्रगितांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.