रामराजे निंबाळकर पुन्हा सभापती?, विधान परिषद उपसभापतिपद काँग्रेसला

0
12

मुंबई दि.08- विधान परिषदेत बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या रामराजे निंबाळकर यांनाच पुन्हा सभागृहाचे सभापतिपद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात अाहे, तर उपसभापतिपद मात्र काॅंग्रेसला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला अाहे.आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात सभापती-उपसभापतींची निवड हाेणार अाहे.

एकदिवसीय विशेष अधिवेशनासाठी परिषदेचे हंगामी सभापती म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांची निवड राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली अाहे.आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर हंगामी सभापती नव्याने निवडून आलेल्या ११ सदस्यांना शपथ देतील. रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, नारायण राणे, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंह यांचा या नूतन सदस्यांत समावेश अाहे. त्याचप्रमाणे ठाणे व पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून निवडून आलेले रवींद्र फाटक यांनाही या वेळी शपथ दिली जाईल. सदस्यांच्या शपथविधीनंतर लगेचच सभापतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल आणि त्याला कोणी विरोध केला नाही तर हंगामी सभापती बिनविराेध निवड जाहीर करतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नवनिर्वाचित सभापतींना आसनावर नेऊन बसवतील. त्यानंतर सभापती विशेष अधिवेशन संपल्याचे जाहीर करतील.

विरोधी पक्षनेते मुंडे
विधान परिषदेच्या िवरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची फेरनिवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. धनंजय हे राष्ट्रवादीचा तरुण व आक्रमक चेहरा असून त्यांची याआधीची सभागृहातील कामगिरी प्रभावी ठरली आहे.