काँग्रेसचा बुलंद आवाज आज विधान परिषदेत

0
8

मुंबई- आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषाशैलीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक तगडे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे मुत्सद्दी राजकारणी, कोकण विकासाचे शिल्पकार, काँग्रेसचा बुलंद आवाज, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज शुक्रवारी संपन्न होत असलेल्या विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. राज्य विधान परिषदेच्या सभागृहात शपथविधी होईल. श्री. नारायण राणे यांची परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यापासून त्यांच्यावर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता या एक दिवशीय विशेष अधिवेशनाला मोठय़ा उत्साहात सुरुवात होईल. हंगामी सभापती विधान परिषदेवर नव्याने निवडून आलेल्या ११ सदस्यांना यावेळी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देतील. विधानसभेच्या सदस्यांमार्फत निवडून गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नारायण राणे, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विद्यमान मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर आणि आर.एन. सिंह यांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे ठाणे व पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून निवडून आलेले रवींद्र फाटक हेही यावेळी शपथ घेती