गोंदिया,दि.२९ः- आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत समन्वयाने कार्य करायचे असून पक्षात उत्साह व उमंग ठेवा नैराश्याने पक्ष पुढे जात नाही.मी सदैव आपल्या पाठीशी खंबीर उभा असल्याची ग्वाही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना खासदार प्रफुलभाई पटेल यांनी दिली.ते नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.
खासदार प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, संपूर्ण राजकीय जिवनात गोंदिया व भंडारा जिल्ह्याची जिम्मेदारी सांभाळतांना सामाजिक प्रश्न सोडविले आहेत. जनतेचा उत्साह व विश्वसनीयता पाहून लोक आत्मीयतेने जुळलेले आहेत हाच उत्साह व उमंग कायम राहू द्या. आगामी निवडणुकीत समन्वय करून महायुतीचा निर्णय घेतला जाईल. आपण सत्तेत आहो व पुढेही राहू विरोधकांनी पसरवलेल्या भ्रमात राहू नका, पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही. आम्ही माता – भगिनीच्या स्वावलंबन व आत्मनिर्भर बनाण्याकरिता लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, शेतकऱ्यांना बोनस असे जन हिताचे कार्य केले आहे.