तिरोडा: तिरोडा येथील मराठी, हिंदी व पोवारी बोली चे सुप्रसिध्द कवी व गझलकार (साहित्यिक) अँड. देवेंद्र घनश्याम चौधरी हे जयपूर (राजस्थान) येथे इंडियन डायमंड डिग्निटी अवॉर्ड ने सन्मानित झाले.
दिनांक २९/०९/२०२४ रोजी तिरोडा येथील सुप्रसिध्द कवी, गजलकार (साहित्यिक) व वकील अँड. देवेंद्र चौधरी यांचे पोवारी बोली, हिंदी भाषेतील साहित्य व सामजिक क्षेत्रातील कामगीरी बघून त्यांना “भव्या फाउंडेशन” जयपुर राजस्थान” द्वारा आयोजित सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर” येथील आंतरराष्ट्रीय साहित्य मैत्री संमेलनात त्यांना “इंडियन डायमंड डिग्निटी अवार्ड” याने शाल श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर वेळी “भव्या फाउंडेशन” च्या डॉ. निशा माथूर यांनी अँड. देवेंद्र चौधरी यांचे बाबतीत उपस्थिताना सविस्तर परिचय देऊन करून देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सदर सन्मान समारोहात देश विदेशातील विभिन्न क्षेत्रातील जवळपास १०० मान्यवर उपस्थित होते.
हे विशेष की, कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर अनेकदा पुरस्काराने व सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी नेपाळ देशामध्ये आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह मध्ये सन्मानीत करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांनी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले असून सदर सन्मान हा त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे. त्यांच्या मिळालेल्या सन्मानाबद्दल वकील संघ, तिरोडा, जिल्ह्यातील पोवार समाज बांधव व मित्र परिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.