बोरी/ सावरी परिसरातील युवकांचा राष्ट्रवादी अजीत पवार गटात प्रवेश

0
70

अर्जुनी मोर. -अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत अर्जुनी मोर तालुक्यातील बोरी / सावरी येथील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व राजेंद्र जैन यांचे कार्यप्रणालीवर विश्वास ठेवुन तथा राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्राचे युवा नेते दानेश साखरे यांचे कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवुन ता.30 सप्टेंबरला शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटात प्रवेश केला.
तालुक्यातील बोरी/ सावरी येथे क्रिडास्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाचे औचित्य साधुन हा पक्ष प्रवेसाचा कार्यक्रम घेण्यात आला.राष्ट्रवादी कांग्रेस चे युवा नेते दानेश साखरे युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की सध्या युवकच देशाचे आधारस्तंभ आहेत. आपल्याला अर्जुनी मोर.विधानससभा क्षेत्रातुन संधी मिळाल्यास संधीचे सोने करुन युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करुन देता येतील यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. या भागातील युवकांनी उच्च शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करुन शिक्षणाचा फायदा लहान मोठ्या नोक-यासोबतच तंत्रशुध्द शेती,विवीध व्यवसाय करुन आत्मनिर्भर बनुन आपली प्रगती साधण्याचे आवाहन केले.