30.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय आमदार कोरेटे विरोधात खासदार पुत्रासह ११ इच्छुकांची नारेबाजी

आमदार कोरेटे विरोधात खासदार पुत्रासह ११ इच्छुकांची नारेबाजी

0
1090

गोंदिया,दि.०६:: येत्या काही दिवसावर निवडणूका असून इच्छुक उमेदवारांनी तिकिटाकरीता कंबर कसली आहे.आज ६ ऑक्टोबंरला साकोली येथे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.य़ावेळी आमगाव देवरी मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे यांच्या विरोधात इच्छुक ११उमेदवांरानी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.या मतदारसंघातील इच्छुक १२ उमेदवारापैकी आमदार कोरेटे हे एकटेच आपल्या बाजूने राहिले तर उर्वरित ११ जणांनी आमदार कोरेटे विरोधात खासदार पुत्रासह  नारेबाजी केली.गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेवराव किरसान यांचे पुत्र दुष्यंत किरसान,सेवानिवृत्त अधिकारी राजकुमार पुराम यांनी कोरेटे विरोधात खुला मोर्चा उघडल्याने या मतदारसंघात कॉंग्रेस कोरेटेंना डावलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.