34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय अर्जुनी मोरमधून दिलीप बनसोड तर आमगाव मतदारसंघातून राजकुमार पुराम काँग्रेसचे उमेदवार

अर्जुनी मोरमधून दिलीप बनसोड तर आमगाव मतदारसंघातून राजकुमार पुराम काँग्रेसचे उमेदवार

0
983

blank

विद्यमान आमदार सहसराम कोरेटींची तिकिट कापली

गोंदिया,दि.२६ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस पक्षाने आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 80 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत.काँग्रेसच्या दुसर्या यादीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.सोबतच आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी जाहिर करीत विद्यमान आमदार सहसराम कोरेटी यांची उमेदवारी पक्षाने नाकारली आहे.त्यामुळे कोरेटे हे पक्षाच्या उमेदवारासोबत राहतात की अपक्ष रिंगणात असतात  याकडे लक्ष लागले आहे.राजकुमार पुराम हे उच्चशिक्षित असल्याने समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे,त्यामुळे भाजप उमेदवारास ही निवडणूक आता सोपी राहिलेली नाही.

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुराम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

blank