43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून दिपावलीच्या मुहुर्तावर 75 मोबाईल मुळ मालकांना परत

हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून दिपावलीच्या मुहुर्तावर 75 मोबाईल मुळ मालकांना परत

0
416

blank

गोंदिया शहर डी. बी. पथकाची प्रशंसनीय कामगीरी

गोंदिया,दि.२६ः गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील 07 महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेल्या होत्या.सदर तक्रारीचे अनुषंगाने गोंदिया शहर पोलीस ठाणेचे ठाणेदार किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते..

त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोशि कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईल चे अर्ज अपलोड करुन पथकाने गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन हरविलेल्या मोबाईलपैकी एकुण 75 मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीक पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदरचे मोबाईल दिपावली या सणाच्या पुर्व शुभ मुहुर्तावर दि. 26/10/2024 रोजी श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया व गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी  गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि कुणाल बारेवार, अशोक राहांगडाले, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते तसेच सायबर सेल येथील संजय मारवाडे, रोशन येरणे यांनी केली आहे.

blank