राष्ट्रवादी काँग्रेस(अप)चे माजी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
752

गोंदिया,दि.12 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार)चे गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी आज 12 नोव्हेंबरला गोंदियात काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसचा दुपट्टा घालून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा जाहीरपणे काम करीत आपण भाजप विचारधारेला मानत नसल्याचे स्पष्ट संकेत प्रफुल पटेलांना दिले होते.ते गेल्या अनेक महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमापासूनही दूर होते.तसेच आपण आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे.