अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव विधानसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी. राजकुमार बडोले यांच्या प्रचार ताफ्यात दिवसेंदिवस जनतेची उपस्थिती वाढताना दिसत आहे. राजकुमार बडोले यांच्या समर्थकांनी घेतलेली प्रचार मोहीम आता एक चळवळ बनली असून, गावोगावी होत असलेल्या सभा, प्रचार रॅलींना मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.
राजकुमार बडोले यांचा प्रत्येक ठिकाणी उत्साही स्वागत होत असून, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रगती, विकास कार्य आणि जनतेशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे जनतेचा विश्वास दिवसेंदिवस मजबूत होत चालला आहे. “राजकुमार बडोले यांना निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे,” अशी भावना आता जनसामान्यांमध्ये दिसत आहे.
यावेळी बडोले यांनी आपल्या प्रचारात स्थानिक प्रश्न, रोजगार, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शेतकरी हिताचे मुद्दे हाताळले, आणि त्यांना सोडवण्याचा आपला कटिबद्ध निर्धार व्यक्त केला. प्रचार रॅलीच्या ठिकाणी एकत्र आलेल्या लोकांच्या उर्जेने वातावरण भारावलेले होते, आणि “राजकुमार बडोले – विजय निश्चित” अशी घोषणा वातावरणात घुमत होती.लोकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती साथ पाहता, येणाऱ्या निवडणुकीत राजकुमार बडोले यांचा विजय निश्चित असल्याचे जाणवते.