पदाधिकारीविरुध्द काँग्रेसच्या जि.प.सदस्यामंध्ये असंतोष

0
9

गोंदिया(बेरारटाईम्स),दि.१६-गेल्या जुर्ले महिन्यात जिल्हा परिषदेत सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाला जेमतेम एक वर्ष होत आहे.परंतु १६ सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तर अधिकच असंतोष दिसून येत आहे.त्यामुळेच की काय काँग्रेसच्या १६ सद्स्यापैकी १३ सदस्यांनी गटनेते रमेश अंबुले यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन जि.प.अध्यक्ष,आरोग्य व शिक्षण तसेच महिला बालकल्याण सभापतींच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त करीत आमदारापर्यंत आपला संदेश पोचविला.विशेष म्हणजे या पदाधिकायानी एकसुत्री कार्यक्रम हाती घेतला असून आपल्या मतदारसंघाशिवाय कुणालाही काम नाही अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.त्यातच ३०५४ च्या कामात तर अध्यक्ष,उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य सभापतींनी मिळूनच सर्व कामे घेत इतर सदस्यांना लालीपाप दिल्याचीही चर्चा काँग्रेसच्याच सदस्यामध्ये आहे.नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आपल्याच सदस्यांनी विरोधात बोलू नये qकवा राष्ट्रवादीच्या सदस्याच्या मुद्यांना समर्थन देऊ नये यासाठी काँग्रेसच्या एका सभापतीने तर चक्क गटनेत्यासह सहा सात जि.प.सदस्यांना बाहेर नेऊन समजविल्याचीही चर्चा येऊ लागली आहे.
पदाधिकारी हे काँग्रेसच्या सदस्यांनाच अपमानास्पद वागणूक देत कामाचे नियोजनात तारतम्य ठेवत नसल्याचा आरोप आहे.तर दुसरीकडे सव्वा वर्षाचे करार होते पद सोडा यापर्यंत बोलल्याचे वृत्त बाहेर आले आहे.विशेष म्हणजे आरोग्य व शिक्षण सभापतीसमोर तर अध्यक्षांचेही चालत नसल्याचे दबक्या आवाजात काँग्रेसचेच सदस्य बोलू लागले आहेत.जि.प.सदस्यांना त्यांच्या मतदारसंघाचे कामाचे पत्र न देता इतरांना देऊन आमच्या अधिकारावरही घाला घातला जात असल्याची कुणकुण सुरु झाली आहे. कुणी तर नाईलाजास्तव त्यांच्या कक्षात जावे लागते इथपर्यंत बोलतात याचाच अर्थ काँग्रेसच्या सत्तेतच बिघाडीचे सूर उमटू लागले आहेत. त्यातच शिक्षण विभागाच्या एका अधिकाèयाने सप्षपणे अध्यक्षांना सांगताना मॅडम मी तुमचे कामे यादीत समाविष्ठ करुन तर घेतो परंतु तुमचेच शिक्षण व आरोग्य सभापती त्या यादीत नाव कायम ठेवतील की नाही याबद्दल शंका आहे असे सांगून मला मात्र दोष नंतर देऊ नका असे स्पष्ट केल्याचेही समोर आले आहे.यावरुन काँग्रेसमध्ये आरोग्य व शिक्षण सभापतीच अध्यक्षांची भूमिका बजावत असल्याचे काँग्रेसी जि.प.सदस्य बोलतात तर भाजपमध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत आलेल्या आणि पहिल्याचवेळी उपाध्यक्ष पद मिळालेल्यांनी आपल्याच पक्षातील सदस्यांना ज्यांनी किमांन ग्रामपंचायतीचे सरपंचपद पाच वर्ष साभांळल्यानंतर येथे धडक मारली त्यांनाही गप्प राहण्याचे सांगून तुम्हाला जेवड्याचे काम दिले तेवढेच घ्या अशा शब्दात बोलत असल्याची चर्चा भाजपच्या सदस्यामध्येही दिसून येत आहे.माध्यमिक व शिक्षण विभागाला मिळालेला बहुतांश निधीच्या खरेदीत गैरव्यवहार स्पष्टपणे दिसत नसला तरी झाल्याची चर्चा काँग्रेसचेच सदस्य करु लागले आहेत.