अंगणवाडी सेविकांनीच केला असावा अलमारी खरेदीत गैरव्यवहार-सभापती

0
18

जि.प.सदस्य खुशबू टेंभरेंनी काढला टीएचआर व अलमारी खरेदीचा गैरव्यवहार
बालकल्याण सभापतींची जि.प.सर्वसाधारण सभेत भूमिका
vimal nagpure
गोंदिया(बेरार टाईम्स),दि.१६-जिल्हा परिषदेच्या स्व.वसतंराव नाईक सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महिला व बालकल्याण विभागातील अलमारी खरेदीचा घोटाळा चांगलाच गाजला.सोबतच अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या पोषण आहाराच्या तक्रारी येऊनही महिला बालकल्याण विभागाने न केलेली चौैकशी मध्ये पुरवठादार व अधिकाèयांचे साटेलोटे असल्याचेच दिसून आले.महिला बालविकास विभाग पुणेच्यावतीने स्थानिक अगंणवाड्यामध्ये अलमारीसह काही साहित्य खरेदीसाठी ५ हजार रुपये अनुदान मंजुर करण्यात आले होते.ती खरेदी ही स्थानिक पातळीवरच अंगणवाडी सेविकांनाच करावयाची होती परंतु त्या अंगणवाडी सेविकाकडून ते पैसे सुपरवायझर यांनी गोळा करुन ते कुणाला दिले आणि त्या अंगणवाड्यात अलमारीचा पुरवठा करण्यात आला हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या खुशबू टेंभरे यांनी उपस्थित केला. khusbhu tembhre
श्रीमती ेटेंभरे यांनी तर अंगणवाडीला भेट दिल्यानंतर तेथील भेटपुस्तिकेवर लिहिलेल्या भेटीत अंलमारी नसल्याचे उल्लेख असलेले पत्र आणि अंगणवाडी सेविकेंने पैसे परत मागितल्याचे लिहून दिलेले पत्र सभागृहाला दाखविल्यानंतरही सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्या मुद्याकडे लक्ष देण्याएैवजी महिला बालकल्याण सभापतीसोबत चर्चत मग्न राहिले.हा मुद्दा जोरकसपणे समोर येत असल्याचे लक्षात येताच महिला बालकल्याण सभापती विमल नागपूरे यांनी अलमारी खरेदीसाठी स्थानिकपातळीवरच पैसे दिले असून अंगणवाडी सेविकांनाच खरेदीत गैरव्यवहार केला असावा असा गौप्यस्पोट करीत त्या अंगणवाडी सेविकाचीच चौकशी करण्यात यावी अशी भूमिका घेतली.परंतु श्रीमती टेंभरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर कुणीही देऊ शकले नाही.टीएचआर प्रकरणी सुध्दा महिला बालविकासअधिकारी अंबादे आपण आत्ताच रुजू झाल्याचे कारण पुढे करीत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.याचप्रकरणात गंगाधरा परशुरामकर,जियालाल पंधरे,राजलक्ष्मी तुरकर यांनीही टेभरे यांच्या प्रश्नाचे समर्थन केले परंतु अध्यक्षांनी टेंभरे यांना तुमचे प्रश्न खुप झाले आत्ता थांबा असे म्हणून अंगणवाडीतील अलमारी खरेदी व टीएचआर पुरवठ्यातील गैरव्यवहारावरच पडदा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे याप्रकरणी बेरार टाईम्सनेही काही अंगणवाड्यांना भेट देऊन विचारणा केल्यावर पैसे परत मागितल्याचे सांगण्यात आले.तर गोरेगाव तालुक्यातील काही अंगणवाडीसेविकानी तर आम्हाला अद्यापही पैसे मिळाले नसून कुणी माहितीही दिली नसल्याची माहिती दिली.यावरुन याप्रकरणात मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसून पुरविलेल्या अलमारीची गुणवत्ता कशी असेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.