बडोलेंना सडक अर्जुनी, गोरेगाव तालुक्यानी तारले

0
203
अर्जुनी मोरगाव,दि.०३ः- येथील विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मते कुठून मिळाली याची जुळवाजुळव सुरू आहे. महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 82,506 मते मिळाली.त्यांनी मविआचे काँग्रेस उमेदवार दिलीप बंसोड यांचा 16,415 मतांनी पराभव केला. बडोलेंच्या विजयामध्ये सडक अर्जुनी, गोरेगाव तालुक्याचा मोठा वाटा असल्याचे प्राप्त मतांवरून दिसून येते. मतदार संघातील अरुणनगर, गौरनगर, वडेगाव/सडक बुथवर बडोलेंना सर्वाधिक मते मिळाली.
प्रहारचे सुगत चंद्रिकापुरेंना तिसर्‍या क्रमांकाची 15,428 मते मिळाली. गोरेगाव तालुक्यातील अडीच जिप क्षेत्रातून बडोलेंना 14,212 मते, बंसोड यांना 10 हजार 452 मते, सुगत चंद्रिकापुरेंना 1039 मते, दिनेश पंचभाई यांना 257 मते, अपक्ष अजय लांजेवार यांना 730 मते मिळाली. यात बडोलेांना 3760 मतांची आघाडी मिळाली. सडक अर्जुनी तालुक्यात बडोलेंना 31 हजार 578 मते, बंसोड यांना 20 हजार 61 मते, चंद्रिकापुरेंना 8,947 मते, पंचभाईंंना 1,453 मते, लांजेवार यांना 2,246 मते मिळाली. Rajkumar Badole सडक अर्जुनी तालुक्यात बडोलेंना 11,517 मतांची आघाडी मिळाली. अर्जुनी मोर तालुक्यात बडोलेंना 36 हजार 65 मते, बंसोड यांना 34 हजार 743 मते, चंद्रिकापुरेंना 5,278 मते, पंचभाईंना 3,685 मते, लांजेवार यांना 1,709 मते मिळाली. तालुक्यात बडोलेंना 1,322 मतांची आघाडी आहे. बडोलेंना पोस्टल मते 651, बंसोड यांना 835 मते, चंद्रिकापूरेंना 164 मते, पंचभाईंना 58, लांजेवार यांना 59 मते मिळाली.
वडेगावने फेडले बडोलेंचे उपकार अर्जुनी मोर तालुक्यात सर्वाधिक बूथ असूनही बडोलेंना 1,322 मतांची आघाडी मिळाली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनाचा विषय ठरत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव स. बडोलेंचे दत्तक गाव आहे. येथे बडोलेंनी अनेक विकास कामे केली. येथील भाजपाचे कर्मठ नेते राजेश कठाने यांच्या नेतृत्वात नियोजनामुळे वडेगाव तालुक्यात नंबर वन आहे. येथील दोन्ही बुद्धावर बडोलेंना 899 मते असून 744 मताची आघाडी आहे.अर्जुनी मोर तालुक्यातील अरुणनगर येथे बडोलेंना दोन्ही बुथवर 1,377 मते मिळाली. 1,272 मतांची आघाडी आहे. गौरनगर येथील दोन्ही बुथावर बडोलेंना 1,055 मते मिळाली. 745 मतांची आघाडी आहे.