फुले-आंबेडकरी वाङ्मयकोशात गोंदिया जिल्ह्यातील पाच कवी-लेखकांची नोंद

0
427

गोंदिया:- ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ या चौदाशे पानांच्या ग्रंथात ५५० साहित्यिकांच्या साहित्याची त्यांच्या परिचयासह दखल घेण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील माणिक गेडाम,युवराज गंगाराम, बापू इलमकर, कालिदास सूर्यवंशी आणि सालेकसा येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नंदू वानखडे या पाच साहित्यिकांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून निवृत्त झालेले नामवंत कवी, संशोधक व समीक्षक प्रा.डॉ. महेंद्र भवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपादित केलेला सदर ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालेला आहे.
प्रख्यात विचारवंत लेखक, भारतीय राज्य घटनेचे भाष्यकर, तथा पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सदर मौलिक ग्रंथाचे पुणे येथे प्रकाशन झाले आहे. या ग्रंथात फुले-आंबेडकरी साहित्याच्या सन १९५६ च्या प्रारंभापासून २०२२ पर्यंतच्या जवळ-जवळ सत्तर वर्ष कालावधीतील दिवंगत व हयात असलेल्या ५५० स्त्री-पुरुष लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांना, सामान्य वाचक, विद्यार्थी, संशोधक व अभ्यासकांना हा कोश संदर्भ ग्रंथ म्हणून पूरक ठरणार असल्याचे मत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले आहे
तर गोंदिया जिल्ह्यातील पाच कवी-लेखकांचे भिन्नभाषी साहित्य मंडळाचे संयोजक शशी तिवारी, रमेश शर्मा, प्रकाश मिश्रा, छगन पंचे, निखिलेशसिंह यादव, मनोज बोरकर, सुरेंद्र जगने, किसनसिंह गुरु, रुपचंद जुम्हारे, चंद्रप्रकाश बनकर यांनी अभिनंदन केले आहे.