गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्याचा गुरूवारी (दि.19) गडचिरोलीत निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी चौकात हे निषेध आंदोलन केले. यावेळी नारेबाजी करत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी असे म्हणत चौकात निषेधात्मक निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, याशिवाय प्रभाकर वासेकर, रमेश चौधरी, नंदु वाईलकर, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, निशांत वनमाळी, काशिनाथ भडके, देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, शिवसेना (उबाठा)चे पवन गेडाम, सहेबाज शेख, तसेच कुणाल कोवे, मिलिंद बरसागडे, कुसुम आलाम, पौर्णिमा भडके, आशा मेश्राम, रिता गोवर्धन, कविता उराडे, वर्षा गुलदेवकर, शालिनी पेंदाम, सुनीता रायपुरे, गीता वाळके, लीना उंदीरवाडे, स्नेहा सय्यद, जितेंद्र मुनघाटे, सत्यभामा कोटगले, पुरषोत्तम सिडाम, संजय वाकडे, रवी गुंडावार, पांडुरंग शेंडे, गणपत मेश्राम, संतोष पदा, बालाजी पोटावी, मधुकर पोटावी, बालू गोवर्धन, नरेंद्र डोंगरे यांच्यासह अनेक आंबेडकरीप्रेमी नागरिक उपस्थित होते.