गोरेगाव पंचायत समिती सभापती पदाच्या शितल बिसेन व नलिनी सोनवणे दावेदार

0
350
गोरेगांव,दि.१०ः गोरेगाव पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण आज 10 जानेवारीला जाहीर झाले असून सभापती पद सर्वसामान्य महिला करीता राखीव करण्यात आले आहे.आरक्षणाची घोषणा होताच सभापती पदाकरीता स्पर्धेा सुरु झाली असून मुख्य दावेदारीत मुंडीपार पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सदस्य शितल सुरेंद्र बिसेन यांच्याकडे बघितले जात आहे.पक्षाच्या नजरेतही त्या प्रथम क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे.पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मताने विजयी होण्याचाही बहुमान पटकावलेला आहे.तर दुसरीकडे पाथरी गणाच्या पंचायत समिती सदस्य नलिनीताई सोनवणे व डव्वा पंचायत समिती गणाच्या सदस्य व माजी पंचायत समिती सभापती चित्रलेखाताई चौधरी यांचेही नाव चर्चेत आहे.यात माजी सभापती राहिलेल्या चित्रलेखा चौधरी यांनी सभापती पदावर काम केल्याने पक्ष शितल बिसेन व नलिनी सोनवणे या दोघापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे नक्की झाले आहे.
तर दुसरीकडे उपसभापती पदाकरीता सुध्दा स्पर्धा असून पंचायत समिती सदस्य व गटनेता रामेश्वर मारवाडे,सोनी पं.स.गणाचे सदस्य किशोर पारधी व निंबा पंचायत समिती गणाचे सदस्य रमेश पंधरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.