गोंदिया,दि.२०ः गोंदिया पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या पुढील अडिच वर्षाच्या कार्यकाळासाठी आज २० जानेवारीला निवडणूक होत आहे.पंचायत समिती सभापती पदावर आमदार विनोद अग्रवाल यांचे खंदे समर्थक विद्यमान सभापती मुनेश रहागंडाले यांची तर उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवलाल जमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे निर्विरोध निवड झाली आहे.पंचायत समितीवर एकहाती सत्ता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची असल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
अडिच वर्षापुर्वी पंचायत समितीमध्ये आमदार विनोद अग्रवाल यांच्या गटाचे १० सदस्य निवडूण आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भाजपचे १०, २ अपक्ष व १ बसपा, अशी सदस्य संख्या आहे.भाजपकडून विद्यमान सभापती मुनेश रहागंडाले यांच्यासोबतच एकोडी पं.स.क्षेत्राचे सदस्य अजाबराव रिनायत,खमारीचे तवाडे यांच्या नावाची चर्चा होती.मात्र आमदार अग्रवाल यांनी बाजी मारत मुनेश रहागंडाले यांना पुन्हा सभापतीपदावर विराजमान केले.