गोरेगाव पंचायत समिती सभापतीपदी चित्रलेखा चौधरी तर उपसभापती रामेश्वर महारवाडे

0
1088
गोरेगाव,दि.२०ः पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला निवडणूक झाली असून सर्वसामान्य महिला करीता राखीव असलेल्या सभापती पदावर डव्वा पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्या चित्रकला चौधरी यांची तर उपसभापती पदावर पंचायत समिती सदस्य व गटनेते रामेश्वर महारवाडे यांची निवड झाली आहे.भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार यांच्या समक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सभापती पदाच्या स्पर्धेत मुंडीपार पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सदस्य शितल सुरेंद्र बिसेन यांचे नाव आघाडीवर होते.मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक त्यांचे नाव मागे पडले.मात्र उपसभापती पदाच्या स्पर्धेत सोनी पंचयात समिती क्षेत्राचे सदस्य किशोर पारधी यांचेही नाव चर्चेत होते,ते सुध्दा मागे पडल्याने भाजपच्या वरिष्ठांनी गोरेगाव पंचायत समितीमध्ये धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे दिसून आले.