संख येथे शरद पवारांच्या हस्ते स्व. बसवराज (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

0
208

संख(राजेभक्षर जमादार),दि.२२ः जत तालुक्यातील संख येथे स्व. बसवराज (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती सुशोभित पुतळा अनावरण सोहळा दिनांक 24 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.जत तालुक्याचे संख गावांचे सुपुत्र तथा जेष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बसवराज पाटील काका यांचा संख येथे उभारण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुभाष पाटील, सरपंच संख ता. जत. व पुतळा अनावरण संयोजन समिती संखच्या वतीने करण्यात आले आहे.