शिवसेना युवासेनेला झटका, महेश डुंभरेसह 1150 कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीं काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश

0
214

गोंदिया,दि.२३ : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे सडक अर्जुनी तालुक्यातील युवा नेतृत्व असलेले महेश डुंभरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस(अप)मध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

महेश डुंभरे हे शिवसेनेत युवा सेना जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी मोरगाव अर्जुनी,गोरेगाव,देवरी या तालुका परिसरात शाखा तयार करुन शिवेसना पक्ष वाढविले होते.मात्र पक्षात होत असलेल्या कुंचबनेमुळे त्यांनी शिवेसना सोडून आज 23 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंधराशे कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ह्या गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. डुंभरे यांच्या पक्षप्रवेशाने गोंदिया जिल्ह्यात पुन्हा युवा सेनेला मोठी खिंडाळ पडल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते महेश डुंभरे यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी बाजार समितीचे सभापती अविनाश काशीवार,जिल्हाध्यक्ष प्रेम रहागंडाले,बँकेचे संचालक राजू एन.जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.