बुलडाणा, दि. 23: अभिषेक पडवळ या एक वर्षाच्या बालकाला त्यांच्या नातेवाईकांनी बाल कल्याण समितीकडे दि. 9 नोव्हेंबर रोजी सुपूर्त केले. तेव्हापासून बालकाला यशोधाम लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन बुलढाणा येथे ठेवण्यात आले असून बालकाच्या पालक व रक्तसंबधातील नातेवाईकांनी अद्यापर्यंत संपर्क साधला नाही. सदर बालकाच्या पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांनी 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.
बालक नामे साई ऊर्फ अभिषेक पडवळ या बालकाला त्यांची काकू नामे वंदना हरसिंग पडवळ रा. नागझरी ता.खामगाव यांनी बाल कल्याण समितीकडे स्वाधीन केले होते. या बालकाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. दाखल केल्यापासून या बालकाची विचारपूस, सांभाळण्यासाठी किंवा ताबा घेण्यासाठी कोणीही आलेले नाहीत. सदर बालकाचे पुनर्वसनासाठी दत्तक विधान मुक्त करणेकरिता विधी मुक्त करणे आवश्यक असल्याने बालकाचे कोणी रक्तसंबंधातील नातेवाईक असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत यशोधाम दि लव्ह ट्रस्ट फॉर इंडियन चिल्ड्रेन इन नीड, खामगाव रोड, सेंट जोसेफ स्कुल जवळ, सुंदरखेड ता.जि.बुलढाणा या संस्था येथे किंवा सामाजिक कार्यकार्ता रामेश्वर जाधव यांच्या मोबाईल क्र. 9552206503 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.