सांस्कृतिक राष्ट्रवाद हीच पक्षाची विचारधारा – डॉ कोठेकर

0
7

भाजपचे पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान
गोंदिया,दि.२६ – भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा व अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक व्यवस्था या गोष्टींमुळे पक्षाला ङ्कपार्टी विथ द डिफरन्सङ्क असे म्हंटले जाते. एक राजकीय पक्ष म्हणून जवाबदारी पार पाडत असतांना अनेक महत्वाच्या राजकीय,सामाजिक चळवळीतून पक्ष पुढे आला आहे. आपलेपणा, सामूहिकतेच्या भावनेतुन संघटनेची कार्य करण्याची कार्यपद्धती आहे. ङ्कसांस्कृतिक राष्ट्रवादङ्क ही पक्षाची विचारधारा असून ङ्कएकात्म मानववादङ्क या तत्वावर पक्ष कार्य करतो. देशातील शोषित, पीडित, अंतिम घटकाचा विकास हेच आमचे लक्ष्य असून राष्ट्राला पुढे नेण्याकरिता पक्ष कार्य करतो. भारतीय जनता पक्षाचे कोणी मालक नसून हा कार्यकत्र्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांनी केले. ते २२ जुलै पासून सुरु असलेल्या निवासी तीन दिवसीय पं दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात २४ जुलै रोजी समारोप सत्रात मार्गदर्शन करतांना बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोपीय सत्रात मंचावर पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार दयाराम कापगते, केशवराव मानकर,खोमेश रहांगडाले, भेरसिंगभाऊ नागपुरे, अशोक इंगळे, नेतराम कटरे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि प उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, संजय गजपुरे, छायाताई दसरे उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले म्हणाले कि पं श्यामाप्रसाद मुखर्जी व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड हिंदुस्थान व हा देश एकसंघ असला पाहिजे या साठी सतत प्रयत्नशील होते. जात, पात, धर्म बाजूला सारून सांस्कृतिक परंपरा घेऊन भाजपा कार्य करीत आहे. पं दीनदयाल उपाध्याय यांच्या ङ्कअंत्योदयङ्क च्या मार्गाने या राष्ट्राचा विकास करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातून होत असल्याचे ते बोलले. जिल्हाध्यक्ष पटले यांनी सांगितले कि या प्रशिक्षण वर्गात जिल्हातील २५८ कार्यकर्ते उपस्थित होते, एकूण १२ सत्रातून विविध विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण अभियानाची सुरुवात २२ जुलै रोजी उदघाटनाने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष व जिल्हा प्रभारी सुभाष पारधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. या वेळी श्री पारधी यांनी कार्यकत्र्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण अभियानाच्या दुस?्या सत्रात वक्ते प्रा अनिल जोशी यांनी ङ्कआपला विचार परिवारङ्क या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी अध्यक्षतेस्थानी अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद होते. प्रशिक्षण अभियानाच्या दुसèया दिवशी तिसèया सत्रात सीता रहांगडाले यांनी ङ्कमहिला मोर्चा बळकटीसाठी आपले योगदानङ्क या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी अध्यक्षस्थानी महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य सविता पुराम होत्या. सहाव्या सत्रात विभागीय कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी ङ्कमीडिया व्यवस्थापनङ्क या विषयावर मार्गदर्शन केले.प्रशिक्षण अभियानाच्या तिसèया दिवशी दहाव्या सत्रात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन केले. अकराव्या सत्रात विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांनी ङ्कआपली कार्यपद्धतीङ्क या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान नगर परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली. बाराव्या सत्रात समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रशिक्षणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाकरिता भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्यासह चमूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महामंत्री भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे,सुनील केलनका, येसुलाल उपराडे, डॉ लक्ष्मण भगत, विजय बिसेन, प्रमोद संगीडवार, परसराम फुंडे, भाऊराव कठाने, उमाकांत ढेंगे, सलाम शेख, पप्पू अटरे यांनी परिश्रम घेतले.