भंडारा जि.प.विषय समितीच्या निवडणूकीत काँग्रेस राकाँँचे सर्व सभापती ईश्वरचिठ्ठीने विजयी

0
773

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आमदार डाॅ.परिणय फुकेंना धक्का

भंडारा,दि.०७ःभंडारा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाकरीता आज झालेल्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का देत सत्ता आपल्या हातात ठेवली आहे.भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ व भाजपच्या एका सदस्यांने काँग्रेसच्या गटाला समर्थन दिल्याने एकच खळबळ उडाली.

आज झालेल्या विषय समितीच्या निवडणूकीत महिला बालकल्याण समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता नलगोपुलवार तर समाजकल्याण सभापती पदी काँग्रेसच्या शीतल राऊत तर इतर दोन सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद मलेवार व नरेश ईश्वरकर हे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. विशेष म्हणजे काँग्रेसकडे विषय समिती निवडणूकीकरीता स्पष्ट बहुमत नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ व भाजपच्या एका सदस्याला गायब करुन पटोलेनी भाजपचा गेम केला.त्यातच काही दिवसापुर्वी पिपंगळगाव येथील शंकरपटात एकत्र आलेले प्रफुल पटेल व नाना पटोले यांच्यातील भेटीने सुध्दा भाजप नेते डाॅ.परिणय फुकेंना धक्का देण्याचे ठरले तर नसावे ना अशा चर्चांना उधाण आलेय.तर दुसरीकडे भंडारा भाजपच्या अनेक नेत्यांनी आत्ता तरी राज्य व केंद्रातील वरिष्ठांना आमच्यावर नेते लादणे बंद करावे असा सुर या निवडणूकीनंंतर आवळायला सुरवात केली आहे.