34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय बँकेच्या निवडणूकीत महायुती आघाडीवर,गोंदियातून केतन तुरकर विजयी

बँकेच्या निवडणूकीत महायुती आघाडीवर,गोंदियातून केतन तुरकर विजयी

0
437

blank

गोंदिया,दि.३०ः गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाकरीता २९ जून रोजी झालेल्या निवडणूकीच्या मतमोजणीला आज ३० जून रोजी सकाळी १० वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे सुरुवात झाली आहे.२० संचालकाच्या निवडणूकीत २ संचालक आधीच निर्विरोध निवडून आलेले होते.आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल सालेकसा तालुका सेवा सहकारी गटातून आला असून या गटातून काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे येजेंद्रकुमार कटरे(बंटी) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रणित सहकार आघाडीचे प्रभाकर दोनोडे यांचा पराभव केला आहे.आमगाव तालुका गटातून भैरसिंह नागपूरे यानी सुभाष आकरे यांचा तर देवरी गटातून प्रमोद संगिडवार यानी गोपाल तिराले यांचा पराभव केला.गोंदिया गटातून केतन तुरकर यांनी संजय चौधरी यांचा पराभव केला.या निवडणूकीत महायुतीने आघाडी घेतली आहे. गोरेगाव तालुक्यात महायुतीला फटका दुर्गा टाकरे विजयी तर सडक अर्जुनीत गंगाधर परशुरामकर विजयी झाले आहेत.

blank