38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय गोंडेगावचे सरपंच धर्मेद्र बोरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

गोंडेगावचे सरपंच धर्मेद्र बोरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

0
79

blank

भंडारा,दि.१२-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय, भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्राम गोंडेगाव (ता. लाखनी) चे सरपंच धर्मेद्र बोरकर यांनी आपल्या समर्थकांसह माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशामुळे गोंडेगाव व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनाधार अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर विकास व जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री. धर्मेद्र बोरकर यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष  नानाभाऊ पंचबुध्दे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिलभाऊ फुंडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते देवेंद्रनाथ चौबे, जि.प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, अड.विनयमोहन पशिने, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, भंडारा दुध संघाचे संचालक हितेश सेलोकर, जि.प. सदस्य रजनिश बन्सोड, प्रदेश सेवादलचे उपाध्यक्ष श्री. शेखर (बाळाभाऊ) गभने, विजय खेडीकर, सुभाष तितिरमारे, निरज शहारे, शरद इटवले, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank