
अर्जुनी-मोर(९ ऑगस्ट)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी-मोर तालुकाच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत आमदार बडोले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कार्यकर्ते हेच खरी ताकद असून, विकासकामे आणि संघटन बळकट करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत राहणार आहे”. तसेच, संघटन बळकट करताना विकासाच्या गतीत वाढ होईल याची ग्वाही दिली.जिल्हाध्यक्ष प्रेम राहंडाले यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, माननीय प्रफुल पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना चालना मिळेल आणि एवढे मोठे नेतृत्व लाभल्याने विकासाच्या संधी अधिक वाढतील.
कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मीताई तुरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, ओबीसी जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंत परशुरामकर, दि लक्ष्मी राईस मिल अध्यक्ष भोजराम रहेले, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, महिला तालुकाध्यक्ष सुशीलाताई हलमारे, युवक तालुकाध्यक्ष किशोर ब्राह्मणकर, माजी जि.प. सदस्य रतिराम राणे, नगरपंचायत सभापती दाणेश साखरे, योगेशजी नाकाडे, दादाजी संग्रामे, सुखदेवजी मेंढे, आकाश ठवरे, सुधांशु मेहता आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उद्धवजी मेंहदळे यांनी केले तर आभार अजय शहारे यांनी मानले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमही पार पडला.





