34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ११४ शहिद आ.गोंड गोवारी बांधवांच्या स्मृती स्थळीं जागतिक आदिवासी दिन साजरा

११४ शहिद आ.गोंड गोवारी बांधवांच्या स्मृती स्थळीं जागतिक आदिवासी दिन साजरा

0
22

blank

अर्जुनी मोरगाव :मुळनिवासी यांच्या हक्क, अधिकार आणि संस्कृतीचे जतन व्हावं व मानवाधिकाराचे संरक्षण व्हावे त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ (UNO) द्वारे ११ व्या अधिवेशनात मुळनिवासी घोषणा प्राप्त झाल्यानंतर ९ आगस्ट १९९४ रोजी जागतिक आदिवासी/मुळनिवासी दिन म्हणून आदिवासी समुहात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोंड गोवारी समाजाने स्थानिक ११४ शहिद गोंड गोवारी बांधवांच्या स्मृती स्थळीं मानवंदना देऊन आदिवासी थोर क्रांतीकारी वीर बिरसा मुंडा, पारिकुपार लिंगो, जय गंगोदाई प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण तिरु जिल्हाध्यक्ष तिरु प्रभाकर नेवारे, तालुका अध्यक्ष गोपाल ठाकरे, तालुका सचीव डॉ पुरुषोत्तम राऊत, अनंता नेवारे, पांडुरंग नेवारे, प्रमोद नेवारे, मधुकर राऊत,नितेश राऊत, वर्षा काळसर्प, रेखा मसराम, तिरु.सुरेशजी वट्टी,तिरु.चंद्रशेखर वट्टी मेंढकी बकी, अमोल कोडापे, श्रीराम कुसराम कोजबी, सुभाष मानकर तसेच तालुक्यातील गोंड गोवारी समाज यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतीक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

blank