32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय तिरोडा राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष पदी खुमेंद्र रहांगडाले

तिरोडा राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष पदी खुमेंद्र रहांगडाले

0
120

blank

तिरोडा – तालुक्यातील बोदलकसा येथील रहिवासी खुमेंद्र रहांगडाले यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवा पक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खुमेंद्र रहांगडाले यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे, गोंदिया जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. अविनाश जयस्वाल, जिल्हा युवा अध्यक्ष केतन तुरकर, अखिलेश सेठ, भिवापूर सरपंच राजू ठाकरे, देवेंद्र चौधरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank