
भंडारा,दि.१३ः- जिल्ह्यासाठी मंजूर झालेले स्वतंत्र महिला रुग्णालय सुरू करण्यास प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला विलंब होत असल्याने भंडारा शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
जर महिला रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात आले नाही, तर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र व व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
भंडारा जिल्ह्यातील माता व नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा कोणताही प्रयत्न शिवसेना सहन करणार नाही. जनतेच्या हक्कासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढत राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख अनिल गायधाने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, नेते दिपक गजभिये, नितीन धकाते, शहर प्रमुख रोशन काटेखाये, नरेंद्र बुरडे, संघटक मनोज बोरकर, राहुल वाघमारे, अतुल वैरागडे, संजय चौधरी बाबुराव जी बागडे , राजेश चोपकर, मुकेश थोटे, तेजस लांजेवर , हेमंत निंबारते, प्रकाश देशकर,सचिन बागडे,दिनेश भजनकर, नितीन पराते, विकास मदनकर, दिनेश भुरे, सचिन बागडे नितेश मोगरे, पंकज परते उमेश लांजेवर, चेतन शिवरकर, नरेश बार्बरराय, मोरेश्वर मते, तसेच महिला आघाडीचे सौ आशा गायधाने, सौ उमा मोटघरे, आशा गिरेपुंजे, मोना मुरकुटे, अश्विनी बुरडे,अर्चना श्रीवास्तव, शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





