43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक पद्धती रुजवून दुग्ध उत्पादन वाढवावे-जि.प.अध्यक्ष भांडारकर

पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक पद्धती रुजवून दुग्ध उत्पादन वाढवावे-जि.प.अध्यक्ष भांडारकर

0
48

blank

देवरी,दि.१३ः पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, जिल्हा परिषद गोंदिया तसेच पंचायत समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गणुटोला/ककोडी येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात विविध जातींच्या दुधाळ जनावरांचे, पशुपक्ष्यांचे प्रदर्शन, दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान, चारा व्यवस्थापन, पशुवैद्यकीय सेवा आणि शेतकरी-गोपालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन सत्रे यांचा समावेश होता.अशा कार्यक्रमांमुळे पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक पद्धती रुजाव्यात आणि दुग्ध उत्पादन वाढावे, यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे विचार जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला संजय पुराम आमदार, दिपा चंद्रिकापुरे सभापती पशु व कृषी, अनिल बिसेन सभापती पं. स., राधिका धरमगुळे जि.प. सदस्य, कल्पना वालोदे जि.प. सदस्य, उषाताई शहारे जि.प. सदस्य, अंबिका बंजार पं. स. सदस्य, प्रल्हाद सलामे पं. स. सदस्य, श्यामकला गावळ पं. स. सदस्य, भारती सलामे पं. स. सदस्य, वैशाली पंधरे पं. स. सदस्य, शैलजा सोनवाने माजी सभापती तथा पं. स. सदस्य, रंजीत कासम पं. स. सदस्य, अशोक नरेटी उपसरपंच, बलदेव कुंभरे, रसिका मडावी, हेरडकरजी ठाणेदार, कुसबा मडावी, चैनसिंगजी, कांतीलाल पटले सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन, डॉ. संजिवनी वाघमारे सहाय्यक आयुक्त, डॉ. देवेंद्र कटरे प्रकल्प अधिकारी तसेच इतर मान्यवर आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि गोपालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पंचायत समिती देवरीचे सदस्य, स्थानिक गोपालक यांनी सहकार्य केले.

blank